राहुरी(वेबटीम) या वर्षीचे राष्ट्रीय सहकार धोरण सहकार क्षेत्राच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे असे प्रतिपादन डॉ. मोहंती यांनी केले. आज फ...
राहुरी(वेबटीम)
या वर्षीचे राष्ट्रीय सहकार धोरण सहकार क्षेत्राच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे असे प्रतिपादन डॉ. मोहंती यांनी केले.
आज फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीजच्या संचालक मंडळाची विशेष बैठक (VAMNICOM) पुणे येथे संपन्न झाली.बैठकीपूर्वी VAMNICOM चे मा. संचालक Dr. Suva Kanta Mohanty यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेचा केंद्रबिंदू होता राष्ट्रीय सहकार धोरण 2025, जे नुकतेच केंद्रीय सहकार खात्याने जाहीर केले आहे.
वैमनिकामचे संचालकडॉ. सुवाकाता मोहंती यावेळी म्हणाले, सहकार क्षेत्रासाठी खास MBA अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
सहकारी संस्थांच्या विकासासाठी आवश्यक टप्प्यांचे दस्ताऐवजीकरण (documentation) सुरु केले आहे. नवीन धोरणानुसार सहकारी संस्थांनी शेती, दुग्ध, मत्स्यव्यवसाय यासारख्या नॉन-क्रेडिट क्षेत्रांमध्ये सक्रिय होणे आवश्यक आहे.काही सहकारी संस्था अत्यंत उत्कृष्टपणे काम करीत आहेत.मात्र संस्थेतील सक्षम नेतृत्वानंतर संस्था तितक्याच व्यवस्थित पणे चालणे महत्त्वाचे आहे. अशासाठी सक्षम व्यवस्था ऊभारली पाहिजे.त्यासाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांना व संचालकांना प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.जेणेकरून सहकार क्षेत्र अधिक प्रभावीपणे कार्य करू शकेल. फेडरेशनच्या वतीने डॉ. मोहंती यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. फेडरेशनच्या अधिकृत संचालक मंडळाची बैठक झाली. ज्यात विविध धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या चर्चेत सहकार क्षेत्राच्या समग्र विकासावर तसेच सहकारासाठी दिलेल्या योगदानावर विशेष चर्चा करण्यात आली. ज्यामुळे आज सहकार चळवळ इतक्या बळकट पायावर उभी आहे
या बैठकीस मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे ,उपाध्यक्ष प्रा. डॉ. व्ही. एस. अकंलकोटे पाटील, संचालक अजिनाथ हजारे, मगराज राठी,नारायण खांडेकर, अँड. एस. एस. गाडगे, अशोक ओव्हाळ, सुकुमार अण्णा पाटील,मोमीन शेख, vamnicom चेसहाय्यक व्यावसायिक बी. धर्मराज,बी किशोर, वैभव बोडखे, आदी मान्यवर उपस्थित होते.
फेडरेशन कडून सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय, प्रशिक्षण, आणि समर्पित कृती सुरूच राहील अशी ग्वाही फेडरेशन चे अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांनी दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत