संतोष खाडे यांची राहुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संतोष खाडे यांची राहुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या उपसभापतीपदी संतोष खाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेचे मावळते उपसभ...

(राहुरी : श्रेयस लोळगे)


राहुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या उपसभापतीपदी संतोष खाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेचे मावळते उपसभापती बाळकृष्ण पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.


या रिक्त पदासाठी संघाच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक सहकार रावसाहेब खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा पार पडली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक सुधाकर बाबुराव तनपुरे आणि सभापती युवराज सुधाकर तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


संतोष खाडे यांच्या नावाची शिफारस मावळते उपसभापती बाळकृष्ण पवार यांनी केली. या शिफारशीस बाबासाहेबावर यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वानुमते खाडे यांची निवड झाली.


नवीन उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्यावतीने संतोष खाडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडेकर यांचा युवराज तनपुरे यांनी सत्कार केला.


यावेळी दत्तात्रय गडाख, संतोष पानसंबळ, ताराचंद तनपुरे, सखाराम कुमकर, बापूसाहेब कोहकडे , आबासाहेब वाघमारे, ज्ञानदेव हारदे, विष्णू तारडे, अनिल शिंदे, सुनीता लहारे, शोभाताई डुकरे, पुष्पा शेळके, सुभाष डुकरे, मनोज लहारे, आबासाहेब शेटे, संस्थेचे सचिव बाळासाहेब फुलसंदर तसेच कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"आमचे नेते सुधाकर बाबुराव तनपुरे आणि युवराज दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने संघाचे काम पुढे नेऊ. संघाच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हितासाठी पूर्ण जबाबदारीने कार्य करीन."

उपसभापती संतोष खाडे 

(राहुरी तालुका खरेदी विक्री संघ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत