राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे ग्रामपंचायत हद्दीतील गीते वस्ती येथे आज पहाटे ६ वाजता बिबट्याचा हल्ल्यात कालवड ठार झाल्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे ग्रामपंचायत हद्दीतील गीते वस्ती येथे आज पहाटे ६ वाजता बिबट्याचा हल्ल्यात कालवड ठार झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
बिबट्याचा वावर आज पहाटे गीते वस्ती परिसरात दिसून आला. यावेळी राजेंद्र जाधव यांच्या मालकीची कालवड बिबट्याने फस्त केली.त्यानंतर सीताराम गीते यांच्या घरापासून जाऊन रमेश गीते यांच्या गिन्नी गवतात शिरून बिबट्याने धूम ठोकली.
गीते वस्ती, सुर्यानगर भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन होते. गीते वस्तीवर अनेक शेळ्या बिबट्याने फस्त केल्या आहे. वनविभागाकडे अनेक वेळा तक्रारी करून पिंजरे बसविले जात नसल्याने या भागातील शेतकरी व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत