राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी ) संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या., राहुरी फॅक्टरी या संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आ...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या., राहुरी फॅक्टरी या संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने संस्थेमार्फत श्रीसत्यनारायण पूजेचे आयोजन गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तिर्थप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी साधून सर्व सभासद, ठेवीदार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुजाता सुधाकर कदम, उपाध्यक्ष श्री. भालचंद्र केशव थोरात, संस्थापक व संचालक प्रा. श्री. सुधाकर रामनाथ कदम तसेच मार्गदर्शक श्री. आण्णासाहेब दगडु चोथे संचालक डॉ. श्री. शौकत अब्दुलअजीज सय्यद, श्री. विठ्ठल भाऊराव शेटे, श्री. बबन तान्हाजी डोंगरे, श्री. पारसमल बाबुलाल खिवंसरा, श्री. विजयकुमार दत्तात्रय खकेकर, श्री. संदीप शिवाजी माने आणि सौ. स्मिता मुकुंद वेदपाठक यांनी केले आहे.
सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहून संस्थेच्या प्रगतीचा आनंद सामायिक करण्याचे आवाहन संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत