राहुरी पोलिसांची कारवाई: नॉन-बेलेबल वॉरंटधारक ७ आरोपी अटकेत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी पोलिसांची कारवाई: नॉन-बेलेबल वॉरंटधारक ७ आरोपी अटकेत

(राहुरी श्रेयस लोळगे)   राहुरी पोलिसांकडून आज मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांतील नॉन-बेलेबल वॉरंट असलेल्या सात आरोपींना अटक करण्यात आली. ही ...

(राहुरी श्रेयस लोळगे) 


राहुरी पोलिसांकडून आज मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांतील नॉन-बेलेबल वॉरंट असलेल्या सात आरोपींना अटक करण्यात आली. ही धडक मोहीम पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

अटकेतील आरोपींची नावे अशी आहेत –

१) गफार गुलाब शेख (रा. मेहेत्रे मळा, राहुरी)

२) राहुल गंगाधर कलापुरे (रा. देसवंडी, ता. राहुरी)

३) शारदा संदीप तनपुरे (रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी)

४) अक्षय सुरेश कुलथे (रा. इंगळे इस्टेट, राहुरी)

५) जालिंदर आसाराम पाषाण (रा. उंबरे, ता. राहुरी)

६) अनिल उत्तम सरोदे (रा. कानडगाव, ता. राहुरी)

७) रुपेश गोरक्षनाथ लष्करे (रा. वांबोरी, ता. राहुरी)

सर्व आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असून, संबंधित जामीन पात्र वॉरंटांचीही यावेळी बजावणी करण्यात आली.

ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचनेनुसार आणि नेतृत्वाखाली राबविण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हवालदार विजय नवले, संदीप ठाणगे, संभाजी बडे, बबन राठोड, सतीश आवारे, सुरज गायकवाड, राहुल यादव, हनुमंत आव्हाड, संजय राठोड, देविदास कोकाटे, प्रवीण बागुल, बाबासाहेब शेळके, गणेश सानप, सचिन ठोबरे, जयदीप बडे, अंकुश भोसले, सागर नवले आदींचा समावेश होता.


नागरिकांना पोलिसांचे आवाहन

राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्याविरुद्ध न्यायालयात चालू प्रकरण असल्यास, समन्स मिळताच वेळेवर न्यायालयात हजर राहा. यामुळे वॉरंट काढण्याची गरज भासणार नाही. चुकून बेलेबल वॉरंट निघाल्यास तत्काळ न्यायालयात हजर व्हावे, अन्यथा नॉन-बेलेबल वॉरंटद्वारे अटक होण्याची शक्यता असते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत