शांती चौकाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यातून समाजबंध दृढ – अरुण तनपुरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शांती चौकाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यातून समाजबंध दृढ – अरुण तनपुरे

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- "समाजातील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला चांगल्या संस्कारांचा वारसा मिळावा यासाठी धार्मिक, सांस्कृतिक...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-



"समाजातील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला चांगल्या संस्कारांचा वारसा मिळावा यासाठी धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांची गरज आहे. शांती चौक मित्र मंडळाने केलेले कार्य हे खरोखरच कौतुकास्पद असून भविष्यात अन्य मंडळांनी  याच प्रकारे समाजकार्याचा नवा आदर्श निर्माण करावा असे आवाहन डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी केले.


राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सव सोहळ्याचे उद्घाटन काल अरुण तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले प्रसंगी ते बोलत होते.



यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे,तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे,

माजी नगरसेवक प्रदीप गरड,डॉ.संदीप मुसमाडे,दिलीप तनपुरे, हॉटेल साई समाधानचे दत्तात्रय दरंदले आदिंसह मान्यवर उपस्थित होते.



प्रारंभी स्वागत शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी केले. यावेळी अरुण तनपुरे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.पौरोहित्य पंकज तानवडे गुरू यांनी केले.



यावेळी प्रकाश सोनी,पत्रकार शिवाजी घाडगे,नितीन डंबाळे हर्षद ताथेड,रामेश्वर तोडमल,नितीन डंबाळे, दत्ता साळुंके,राजू साळुंके,सुनील संचेती,प्रितेश सोळंकी,सोमा आहेर, ऋषभ संचेती, मुन्ना अन्सारी,योगेश जाधव,साई त्रिभुवन, मुन्ना अन्सारी, मुन्ना अन्सारी, संदीप तरवडे, विलास तमनर, श्री.सोनवणे, सुनील संचेती, बाळू भंडारी, प्रितेश सोळंकी,मोहित ताथेड,सौरभ शिंदे आदिंसह शांती चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत