पानेगांवातून पाच हजार भाकरी चटणी, सह फरसाण बिस्किटे मुंबईला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पानेगांवातून पाच हजार भाकरी चटणी, सह फरसाण बिस्किटे मुंबईला

नेवासा (तालुका प्रतिनिधी)  मुंबईमध्ये मराठा आंदोलनातसहभागी झालेल्या मराठा बांधवासाठी सोमवारी दि.१ सप्टेंबर पानेगांव (ता नेवासा)येथून एक घर ए...

नेवासा (तालुका प्रतिनिधी)



 मुंबईमध्ये मराठा आंदोलनातसहभागी झालेल्या मराठा बांधवासाठी सोमवारी दि.१ सप्टेंबर पानेगांव (ता नेवासा)येथून एक घर एक शिदोरी पाठविण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात फरसाण, बिस्किटे चटणी लोणचे पाण्याचे बाॅक्स सह पाच हजार भाकरी,  घेऊन पिकअप सकाळी लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांचा जनसंपर्क कार्यालयातुन मुंबईला रवाना झाली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.



मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना आरक्षणासाठी उपोषणास बसले आहेत. त्यांच्यासमवेत लाखो मराठा बांधवांनी मुंबईतच ठाण मांडून आहे. लाखोंच्या संख्येने असलेल्या मराठा आंदोलकांची खाण्या-पिण्याचे हाल झाल्याचे समोर आल्यानंतर पानेगांव येथून या 

आंदोलकासाठी पिकअप भरून घरची शिदोरी पाठविण्यात आली. ग्रामस्थांना या शिदोरीसाठी रविवारी मदतीचे आवाहन मुळाचे संचालक संजय पाटील जंगले, ॲड, सुभाषराव जंगले, अनिल जंगले ,रमेश गुडधे, बाळासाहेब पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी हनुमान मंदिराच्या सभागृहात ही मदत मराठा समाजा बरोबरच ओबीसी बांधवांनी मांजरी अंमळनेर येथून हि जमा केली.

 यावेळी ग्रामस्थांनी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी संजय जंगले, रामराजे जंगले, सतिश जंगले, डॉ काकडे, अनिल जंगले, नवनाथ जंगले, बद्रिनाथ जंगले,संपत गुडधे, संकेत गुडधे, दिपक जंगले सरपंच सागर आंबेकर, रमेश गुडधे, गणेश चिंधे, रोहिदास चिंधे, साहेबराव जंगले राजेंद्र जंगले, दिनेश जंगले, अमित जंगले, ज्ञानेश्वर जंगले,अजय नाईकवाडे किरण जंगले पोलीस पाटील,माजी उपसरपंच डॉ जयवंतराव गुडधे, नारायण जंगले, दादासाहेब काकडे,बाबासाहेब जंगले, सुनिल जंगले, अनिल जंगले, पांडुरंग जंगले, दत्तात्रय जंगले, सुभाष गुडधे, संदिप जंगले,भाऊसाहेब काकडे, द्वारकानाथ चिंधे, महेश जंगले, दादासाहेब तनपुरे,वैभव ठोसर, हितेश जंगले, विठ्ठल आरंगळे, रामदास गागरे, लक्ष्मण गागरे, भारत जंगले सोपान जंगले, सुखदेव कल्हापुरे, सखाराम जाधव, बाळासाहेब कल्हापुरे,आदींसह मोठ्या संख्येने युवक ग्रामस्थांनी सहभागी झाले.

आदीवासी समाजाचा चौथीत शिकणाऱ्या श्रेयश गोविंद लांघे याने शिदोरी घेऊन तर आला आपल्या खाऊचे पैसे यावेळी त्याने दिले.



  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत उपोषणाला बसले असून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव तेथे उपस्थित आहे त्यांची जेवणाची गैरसोय होत होती आपण हि समाजाचे देणे लागतो. ग्रामस्थांना आवाहन करताच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. 

-संजय जंगले -माजी सरपंच पानेगांव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत