साई सेवा पतसंस्थेत बडोदा बँकेच्या अधिकाऱ्यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साई सेवा पतसंस्थेत बडोदा बँकेच्या अधिकाऱ्यांचा सन्मान

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील बँक ऑफ बडोदा  शाखेचे  मॅनेजर साहेब  जगदीश पंढरीनाथ शिंदे व असिस्टंट मॅनेजर मनोज राधाकिसन शिंदे ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

देवळाली प्रवरा येथील बँक ऑफ बडोदा  शाखेचे  मॅनेजर साहेब  जगदीश पंढरीनाथ शिंदे व असिस्टंट मॅनेजर मनोज राधाकिसन शिंदे यांचा  साई सेवा नागरी पतसंस्थेत सन्मान करण्यात आला.


 यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. प्रदीप लक्ष्मण येवले,  संस्थेचे संचालक  बाळासाहेब भिकाजी तुपे व शिवाजी हरिभाऊ बंगाळ यांनी सन्मान केला.


बँक ऑफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक जगदीश शिंदे  यांनी साई सेवा नागरी पतसंस्थेत खाते व्यवहारा बाबत तसेच बँकेच्या अनेक प्रकारच्या सेवा कश्या प्रकारे पतसंस्थेत वापरता येईल या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जेणे करून संस्थेला अनेक प्रकारच्या सेवा कश्या स्वरूपात वापरता येईल, व संस्थेचा व्यवहार जलद व कार्यक्षम कसा करता येईल या बाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास साई सेवा पतसंस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, तसेच संचालक मंडळाचे सदस्य व संस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत