राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त दि.२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच देवी भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येते. यंदा या उत्सवाचे २० वे वर्ष आहे.
२२ सप्टेंबर रोजी सत्यजित कदम, गणेश भांड, शिवाजीराव कपाळे व श्रीकांत चांडक यांच्या हस्ते घटस्थापना त्यानंतर भव्य दिव्य मिरवणूक सोहळा, २३ सप्टेंबर रोजी आराध्यांचा मेळा, रात्री ९ वा.संवाद जुन्या युगाचा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखा कार्यक्रम, २४ सप्टेंबर रोजी कृष्णा व भूषण राहिंज प्रस्तुत गजर मल्हारीचा नाद भंडाऱ्याचा ,२५ सप्टेंबर रोजी आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांचे व्याख्यान, २६ सप्टेंबर रोजी कोन बनणार भाग्यवान हा प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम, २७ सप्टेंबर रोजी दुपारी रांगोळी व रात्री नृत्य स्पर्धा, २८ सप्टेंबर रोजी दुपारी चित्रकला व रात्री नृत्य स्पर्धा, २९ सप्टेंबर रोजी संगीत खुर्ची स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा, ३० सप्टेंबर रोजी सबसे बडा कलाकार(लघु नाट्य सादरीकरण), १ ऑक्टोबर रोजी होमहवन व सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण व त्यांनतर नवदुर्गांचा जिवंत देखावा व भक्तिमय संगीत संध्या तर २ ऑक्टोबर रोजी देवी विसर्जनाने उत्सवाची सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमांसाठी परिसरातील भाविक व नागरिकांनी उपस्थित रहावे व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत