सिमेंट उद्योग कामगारांच्या वेतनवाढीबाबत चर्चेसाठीच्या मुंबईतील बैठकीत स्नेहल सांगळे यांची उपस्थिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सिमेंट उद्योग कामगारांच्या वेतनवाढीबाबत चर्चेसाठीच्या मुंबईतील बैठकीत स्नेहल सांगळे यांची उपस्थिती

राहुरी(वेबटीम)  राज्यातील सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात कामगार आयुक्तालय,  कामगार भवन, मुंबई येथे  कामगा...

राहुरी(वेबटीम)



 राज्यातील सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात कामगार आयुक्तालय,  कामगार भवन, मुंबई येथे  कामगार आयुक्त श्री.तिमोड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची पहिली बैठक  पार पडली. या बैठकीत राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रमाई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा  स्नेहल सुरेश सांगळे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.



 ८ सप्टेंबर २०२५ रोजी चर्चा झाली असून या बैठकीत सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योगांतील कामगारांचे किमान वेतन ठरविण्याबाबत चर्चा पार पडली. या संदर्भातील स्वतंत्र उद्योग म्हणून “सिमेंट उत्पादन करणारे उद्योग” व “सिमेंटवर आधारित उद्योग” अशा दोन विभागांमध्ये वर्गीकरण करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्याबाबत चर्चा झाली.


या चर्चेच्या अनुषंगाने राज्यातील कामगारांचे वेतन निश्चित करताना सिमेंट उद्योगातील प्रत्यक्ष कामगार संघटनांचे विचार जाणून घेण्यासाठी स्नेहल सांगळे यांना बोलावण्यात आले असता नाशिक विभागातील सिमेंट कामगारांचे प्रश्न व मागण्या राज्यस्तरावर मांडण्याची संधी मिळाली आहे.


 कामगारांच्या हिताच्या दृष्टीने ठरलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कामगारांना न्याय मिळावा यासाठी स्नेहल सांगळे यांनी उपस्थित राहून आपली मते मांडली. सिमेंट व सिमेंटवर आधारीत उद्योगाचे वर्गीकरण तसेच सिमेंट फॅक्टरीतील लोकांना त्यांचे चांगले वेतन निर्धारित करण्याबाबत चर्चा पार पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत