राहुरीतील नागरिकांना दिलासा – थकीत मालमत्ता करावरील शास्ती ५०% पर्यंत माफ; माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नांना यश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील नागरिकांना दिलासा – थकीत मालमत्ता करावरील शास्ती ५०% पर्यंत माफ; माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नांना यश

(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. थकीत मालमत्ता करावर...

(राहुरी : श्रेयस लोळगे)

राहुरी नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. थकीत मालमत्ता करावर लावण्यात आलेली २ टक्के शास्ती आता ५० टक्क्यांपर्यंत माफ करण्यात आली असून, यासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश लाभले आहे.

नगरपालिका सत्तेत असताना तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पदाधिकाऱ्यांनी थकीत शास्ती पूर्णपणे माफ करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी ५० टक्के शास्ती सवलतीस मान्यता दिल्याचे अधिकृत पत्र राहुरी पालिकेला प्राप्त झाले आहे.

या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष अनिल कासार आणि गजानन सातभाई यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “सत्तेवर असताना याच मुद्द्यावर एक शब्द न काढणारे विरोधक, आता निवडणुका जवळ आल्यावर केवळ राजकारणासाठी आंदोलनाची भाषा करीत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.

कासार यांनी सांगितले की, “राहुरी नगरपालिकेने २०२१ मध्येच १०० टक्के शास्ती माफीचा ठराव मंजूर करून तो तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सादर केला होता. शासन बदलाच्या दरम्यान काहीसा वेळ गेला, मात्र तनपुरे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेरीस राज्यातील सर्वच नगरपालिकांना याचा लाभ मिळाला.”

विशेष म्हणजे, आज विरोधक ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाची सत्ता असूनही त्यांनी एकदाही विधानसभेत प्रश्न उपस्थित केला नाही, किंवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्याचीही तसदी घेतली नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, दशरथ पोपळघट, शहाजी जाधव, नंदकुमार तनपुरे, अशोक आहेर, दिलीप चौधरी, सोनाली बर्डे, सूर्यकांत भुजाडी, विजय करपे, प्रकाश भुजाडी, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, संजय साळवे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शास्ती माफीतून सामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा मिळाला असून, यामागे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न निर्णायक ठरले आहेत. निवडणूक जवळ येताच श्रेय घेण्याच्या राजकारणात पडण्याऐवजी वास्तव तपासणे गरजेचे असल्याचा सल्लाही माजी पदाधिकाऱ्यांनी विरोधकांना दिला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत