सोनगाव(वेबटीम) प्रेरणा मल्टीस्टेट सोनगाव शाखेचा १२ वा वर्धापन दिन आज मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. १३ व्या वर्षात पदार्पण कर...
सोनगाव(वेबटीम)
प्रेरणा मल्टीस्टेट सोनगाव शाखेचा १२ वा वर्धापन दिन आज मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. १३ व्या वर्षात पदार्पण करताना साईबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष सुरेश (आण्णा) वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन श्री सुजित वाबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संचालक मंडळातील व्हॉइस चेअरमन, नंदकुमार दिघे, विष्णुपंत वर्पे, मच्छिंद्र हुरूळे, श्री बाळासाहेब दिघे, लक्ष्मण दिघे, पारसराम साबळे, सुभाष दिघे, डॉ. मधुकर दिघे, उत्तमराम घोलप, रंगनाथ दिघे, शंतनू दिघे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पत्रकार श्री अनिल वाकचौरे, श्री भगवान व्यास, एस बँकेचे मॅनेजर व कर्मचारी, तसेच सोनगाव शाखेचे शाखाधिकारी व कर्मचारी वृंद या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमात संचालक श्री नंदकुमार दिघे सर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेत सभासद, ठेवीदार, खातेदार व कर्जदार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले , आजवरच्या प्रवासात आमचा हात घट्ट पकडून आपण जो विश्वास दाखविला त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. आगामी काळातही आपण असेच सहकार्य करावे, हीच अपेक्षा आहे.
त्यांनी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व हितचिंतक यांना सोनगाव शाखेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या वर्धापन दिनामुळे शाखेतील सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शाखेच्या प्रगतीचा प्रवास अधिक गतीमान होऊन भविष्यातही संस्थेची सेवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत