धन्वंतरी पतसंस्थेचे कामकाज कौतुकास्पद :- संचालक भारत वारुळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धन्वंतरी पतसंस्थेचे कामकाज कौतुकास्पद :- संचालक भारत वारुळे

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील नर्सिंग होम ट्रस्टच्या धन्वंतरी कामगार रुग्णालय पतसंस्था या संस्थेच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


येथील नर्सिंग होम ट्रस्टच्या धन्वंतरी कामगार रुग्णालय पतसंस्था या संस्थेच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.


 या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबुराव बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भारत वारुळे हे होते.प्रसंगी सेवानिवृत्त सभासदांच्या दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.


 यावेळी संचालक भारत वारुळे यांनी सभासद व संचालकांना मार्गदर्शन केले. पतसंस्थेचे चेअरमन गजानन वराळे यांनी विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखालील संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती दिली व सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्यात येणार आहे असे जाहीर केले.



प्रसंगी संस्थेचे जेष्ठ सभासद डॉ. बांगर यांनी मार्गदर्शन केले. सदर सभेत ज्येष्ठ संचालिका सौ. चेतना जयंत कुलकर्णी व्हा.चेअरमन श्री विजय डुकरे, संचालक श्री प्रा निलेश जाधव, डॉ. शेकोकर, श्री दत्तात्रय चव्हाण,दत्तात्रय हिवाळे, ज्ञानेश्वर माऊली टिकल,विमल गायकवाड,सौ शोभा ठुबे, सेक्रेटरी डी.जे बोर्डे,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नागरगोजे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री गागरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.धोंडे यांनी केले. आभार आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बांगर यांनी मानले.

यावेळी संस्थेचे मा.चेअरमन भगवान म्हसे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत