राहुरी फॅक्टरीच्या साई सेवा नागरी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या साई सेवा नागरी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात

  राहुरी/वेबटीम:- साई सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, श्रीशिवाजीनगर, ता. राहुरी यांची वार्षिक सर्वसाधारण आज शुक्रवारी सकाळी खेळीमेळीच्य...

 राहुरी/वेबटीम:-

साई सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, श्रीशिवाजीनगर, ता. राहुरी यांची वार्षिक सर्वसाधारण आज शुक्रवारी सकाळी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

अल्पावधीत संस्थेने सुमारे ५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या असून गरजू व्यापारी व सभासदांना दीड कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. संस्थेच्या गेल्या दोन वर्षातील प्रगतीचा आढावा घेतल्यास २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेला ४ लाख ६३ हजार रुपयांचा नफा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुढील काळात संस्थेचे १० कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास चेअरमन प्रदीप लक्ष्मण येवले यांनी व्यक्त केला.

सभाेत व्हा. चेअरमन प्रा. विलासराव मुसमाडे यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी संचालक मंडळाने दिलेल्या सहकार्याची माहिती दिली. 


तर जेष्ठ संचालक शिवाजीराव बंगाळ यांनी संस्थेच्या उलाढालीत सातत्याने वाढ व्हावी यासाठी डेली कलेक्शन एजंटची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच ठेवी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी संचालक मंडळाने विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी संचालक दत्तात्रय गाडे, मनोहर ढूस, सतीश वाघ, सुलोचनाताई भवाळ, बाळासाहेब तुपे, श्रीनिवास शिंदे यांच्यासह इतर संचालक, कर्मचारी वर्ग व पिग्मी एजंट उपस्थित होते. शेवटी चेअरमन मप्रदीप येवले यांनी उपस्थितांचे आभार मानत सभेची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत