वळण गावातील डमाळे वस्तीवरील दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण : तात्काळ शुद्ध पाणीपुरवठ्याची ग्रामस्थांची मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळण गावातील डमाळे वस्तीवरील दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण : तात्काळ शुद्ध पाणीपुरवठ्याची ग्रामस्थांची मागणी

राहुरी राहुरी तालुक्यातील वळण येथील डमाळे वस्तीवरील नागरिक गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित आणि खराब पाण्याच्या पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत....

राहुरी

राहुरी तालुक्यातील वळण येथील डमाळे वस्तीवरील नागरिक गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित आणि खराब पाण्याच्या पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्यात घाण व वास येत आहे.

गंभीर बाब म्हणजे, ग्रामस्थांच्या तक्रारी असूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळे वस्तीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पिण्याच्या पाण्याची ही समस्या गंभीर असून, त्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

डमाळे वस्तीवरील नागरिकांना ग्रामपंचायतीने तात्काळ शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. 

ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याची दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत