(राहुरी : श्रेयस लोळगे) नाथ प्रतिष्ठान, राहुरी आणि जनकल्याण रक्तपेढी, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
नाथ प्रतिष्ठान, राहुरी आणि जनकल्याण रक्तपेढी, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी श्री नामदेव महाराज मंदिर, जंगम गल्ली, राहुरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे तसेच सर्व रोग तपासणी शिबिर व मोफत चेकअप किटचे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडणार असून, राहुरी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या समाजोपयोगी उपक्रमाचे औचित्य हे नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक सौरभ उंडे यांच्या वाढदिवसानिमित्त साधण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत नाथ प्रतिष्ठानने समाजउपयोगी कार्यक्रम करून नागरिकांशी बांधिलकी जपत एक आदर्श निर्माण केला आहे.
या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांना विविध आजारांबाबत मोफत तपासणी करून आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, सहभागी नागरिकांना मोफत चेकअप किट्सचे वाटप देखील केले जाणार आहे.
🕉️ "आरोग्य योजनेत सहभागी होऊया |
रक्तदान करून देशकार्य आणि देवकार्य सहभागी होऊया ||
"भारत माता की जय!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत