राहुरी(वेबटीम) सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पूरपरिस्थतीमुळे शेतकरी व नागरिकांचे झालेले नुकसान तातडीने पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई ...
राहुरी(वेबटीम)
सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पूरपरिस्थतीमुळे शेतकरी व नागरिकांचे झालेले नुकसान तातडीने पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मानव अधिकार संरक्षण समिती यांच्यावतीने तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे व जिल्हा संपर्कप्रमुख लिंबाजी इंगोले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हंटले की, सप्टेंबर २०२५ मध्ये महाराश्ट्र राज्यातील अनेक जिल्हयांमध्ये सलग आणि अत्तिः पावसामुळे गंभिर पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या-नाले तुडूंब भरुन वाहू लागल्याने गावोगांव पाणी शिरले, शोतजमिनी पाण्याखाली गेल्या, रस्ते व वाहतूक ठप्प बराली, जनावरे वाहून गेली आणि हजारों कुंटूंबाचे संसार उद्धवस्त झाले आहेत. १. पुरस्थितीचा आढावाः
अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रातील सुमारे २९ ते ३० जिल्हयांतील १४.४४ लाख हेक्टर क्षेत्रातील पिके पूर्णपणे बाधित झाली आहे.
यामध्ये नाशिक, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, घाराशिव, परभणी, अमरावती, जळगांव वर्धाक सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर इत्यादि जिल्ह्यांचा समावेश आहे.
शेतकरी बांधवांचे सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, भात व इतर खरीप पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहेत. अहिल्यानगर जिल्हयाचा विचार केला तर मातीचे बांध व रस्ते वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप पिके, फळबाग शेतात पाणी साठल्यामुळे मका, कांदा, तूर, सूर्यफुल, बाजरी, टोमॅटो, मिरची, कांदा, भुईमूग, उडीद, , दाक्षे, डाळिंब या प्रकारच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन, बांधीत शेतकऱ्यांना शासनाच्या प्रभावी व आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
अनेक गोरगरीब नागरिकांचे घरे, जनावरे, घरगुती वस्तू पाण्याखाली जाऊन हानी झाली आहे. काही ठिकाणी जिवितहानी, जनावरांचे मृत्यू व ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन विस्कळीत आले आहे अडचणी व अस्पष्टता सर्वत्र पंचनामे तातडीने होत नाहीत.
मोजक्या जिल्हयांमध्ये नुकसानभरपाई जाहिर झाली असली तरी सर्व शेतकरी नागरिकांना अद्याप प्रत्यक्ष
रक्कम मिळालेली नाही. नागरिकांच्या घरमालमत्तेच्या नुकसानीसंदर्भात ठोस मदत योजनांची घोषणा अद्याप झालेली नाही. पारदर्शक व तत्पर मदत प्रक्रियेअभावी पिडित शेतकरी व नागरिक गंभिर मानसिक व आर्थिक संकटात सापडते आहेत.
.
सर्व बांधित गावांमध्ये तातडीने शेतकरी व नागरिकांचे पंचनामे पूर्ण करावेत, पंचनाम्याची माहिती प्रांत व तहसिल पातळीवर जाहिरपणे उपलब्ध करुन दयावी, शेतक-यांच्या पीक नुकसानीसाठी प्रत्यक्ष क्षेत्रफळ व पिकाच्या प्रकारनुसार शंभर टक्के नुकसानभरपाई तातडीने बँक खात्यात जमा करावी, नागरिकांचे घर, जनावरे, घरगुती साधनसामुग्री यांच्या हानीसाठी व जिवित हानीसाठी वेगळी मदत योजना लागू करुन भरपाई द्यावी. सर्व जिल्ह्यात मदत वितरणाची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असावी पात्र व्यक्तींची नांवे, मजूर रक्कम व वितरणाची स्थिती सार्वजनिक करावी, प्रभावित नागरिकांना तत्काळ तात्पुरती निवासव्यवस्था, अन्नधान्य, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, भविष्यात अशा नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, नदीनाल्यांचे खोलीकरण, धरण व्यवस्थापन आदी बाबींवर ठोस कार्यवाही करावी.
आज शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अत्यंत विकट परिस्थितीत आहेत. शासन व प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने कार्यवाही केली नाही तर शेतकरी आत्माहत्या, स्थलांतर व गंभिर सामाजिक प्रश्न निर्माण होतील माणून आपण तातडीने पंचनामे पूर्ण करुन शेतकरी व नागरिकांना संपूर्ण नुकसानभरपाई मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा संपर्कप्रमुख लिंबाजी इंगोले, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय गडाख, जिल्हा निरीक्षक भिकचंद वरघुडे, जिल्हाध्यक्ष रवी सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष राजू शेळके, राहुरी तालुका अध्यक्ष योगेश सिनारे, राहुरी शहराध्यक्ष सोमनाथ येवले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब घोलप, अहिल्यानगर शहराध्यक्ष महेश देशमुख, दीपक आढाव, सनी जगताप, भाऊसाहेब आढाव आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत