(राहुरी :श्रेयस लोळगे) राहुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक व राहुरी नगर परिषदेचे माजी कर्मचारी कै. मोहन (काका) वाल्हुजी साळवे (वय ८० वर्षे) यांचे ...
(राहुरी :श्रेयस लोळगे)
राहुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक व राहुरी नगर परिषदेचे माजी कर्मचारी कै. मोहन (काका) वाल्हुजी साळवे (वय ८० वर्षे) यांचे आज अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
मोहन काका हे अत्यंत शांत, संयमी, नम्र आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने राहुरी शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्याशी संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. आपल्यापेक्षा वयाने लहान असो वा मोठा, प्रत्येकाशी ते प्रेमपूर्वक संवाद साधत. त्यांच्या जाण्याने एक सर्वसामान्यांचा खरा मित्र, मार्गदर्शक आणि सच्चा माणूस हरपल्याची भावना शहरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ रावसाहेब वाल्हुजी साळवे, दोन बहिणी,मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे.
गोकुळ कॉलनीतील लॉंड्री व्यावसायिक सचिन मोहन साळवे यांचे ते वडील होत.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत