वळण सोसायटीच्या चेअरमनपदी उमेश खिलारी बिनविरोध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळण सोसायटीच्या चेअरमनपदी उमेश खिलारी बिनविरोध

  वळण(गोविंद फुणगे)   राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वळण सोसायटीच्या चेअरमन पदी उमेश भाऊसाहेब खिलारी यांची बिन...

 वळण(गोविंद फुणगे)



  राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वळण सोसायटीच्या चेअरमन पदी उमेश भाऊसाहेब खिलारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज गुरुवारी सकाळी सोसायटीच्या सभागृहामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडेकर यांनी निवडणूकीचे कामकाज बघितले.



    वळण येथील सोसायटीची चार वर्षांपूर्वी पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये जनसेवा मंडळाचे सात तर परीवर्तन मंडळाचे सहा संचालक निवडून आले होते. सोसायटीवर जनसेवा मंडळाची सत्ता असून प्रत्येक वर्षी नुतन चेअरमनची निवड पार पडते. मावळते चेअरमन संजय आढाव यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजिनामा दिल्यानंतर हि निवड प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदासाठी जनसेवा मंडळाकडून उमेश खिलारी अन् बाळासाहेब खुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर  बाळासाहेब खुळे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्यानंतर खिलारी यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णयक अधिकारी खेडेकर यांनी घोषित केले. प्रसंगी व्हा.चेअरमन लताबाई कार्ले, संचालक संजय आढाव,  कारभारी खुळे, सर्जेराव आढाव, ज्ञानेश्वर खुळे, बाळासाहेब खुळे, महेश काळे, बंडू डमाळे, ऋषीकेश आढाव, मंदाकिनी राजदेव उपस्थित होते. सचिव विजय शेळके, शामराव पठाण, फकीरचंद फुणगे यांनी सदर प्रकियेस सहाय्य केले आहे.



  संस्थेच्या हितासाठी आपण सर्वांना बरोबर घेऊन संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्न करू असे नूतन चेअरमन खिलारी यांनी यावेळी म्हटले आहे. निवडीनंतर नूतन चेअरमन यांचे विविध पदाधिका-यांनी सत्कार केला प्रसंगी अशोक कुलट, संजय शेळक, मनोज गोसावी, भाजप तालुकाध्यक्ष धनंजय आढाव, डाॅ.किशोर म्हस्के, वसंत कार्ले, प्रदीप कुलट, संतोष खुळे आदिंसह  सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत