राहुरी(वेबटीम) प्रेरणा पतसंस्थेची आठवी शाखा ब्राह्मणीत सुरू होत आहे. शाखेचा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ब्राह्मणी बाजारत...
राहुरी(वेबटीम)
प्रेरणा पतसंस्थेची आठवी शाखा ब्राह्मणीत सुरू होत आहे. शाखेचा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ब्राह्मणी बाजारतळ येथे होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली.
प्रेरणा पतसंस्थेच्या या शाखेचा शुभारंभ माजी नगरविकास व उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते होणार आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रावसाहेब खेडकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.प्रेरणा पतसंस्थेच्या ठेवी सव्वाशे कोटी रुपये असून कर्ज वितरण 77 कोटी रुपये झाले आहे .32 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या पतसंस्थेचे वीस वर्षांपूर्वी संगणकीकरण झालेले आहे .कोअर बँकिंग ते सर्व बँकिंग सुविधा ब्राह्मणीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत .संस्थेचे मोबाईल ॲप देखील आहे. या सर्व बँकींग सुविधा ब्राह्मणी सारख्या बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध होत आहेत.ग्राहकांची अनेक वर्षांची अडचण आता दूर होणार असल्याचे सुरेश वाबळे यांनी सांगितले. संस्थेच्या या आधी गुहा ,म्हैसगांव, तांभेरे ,राहुरी ,आंबी व श्रीरामपूर येथे शाखा आहेत.वांबोरी नंतर लगेचच ब्राह्मणी शाखा सुरु होत असून देवळालीप्रवरा येथेही लवकरच नवीन शाखा कार्यान्वित होणार आहे असे व्हा . चेअरमन मच्छिंद्र हुरुळे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत