राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील अदिती विलास सांगळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ पात्रता (सीट) परीक्षेत कॉमर्स वि...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील अदिती विलास सांगळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ पात्रता (सीट) परीक्षेत कॉमर्स विषयात १९२ गुण मिळवत यश संपादन केले आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे गावासह तालुक्याचा अभिमान वाढला आहे.
अदिती यांचे प्राथमिक शिक्षण जोगेश्वरी आखाडा येथील शाळेत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी राहुरी येथील धुमाळ महाविद्यालयात प्रवेश घेतला. ११ वी पासून एम.कॉम पर्यंतचे शिक्षण त्यांनी याच महाविद्यालयात पूर्ण केले. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि प्रामाणिकपणे मेहनत घेण्याची वृत्ती यामुळे त्यांनी राज्यस्तरीय या महत्त्वपूर्ण परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले.
या यशामागे अदिती यांना पालकांचे मार्गदर्शन, प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण सहकार्य तसेच कुटुंबीयांचे प्रोत्साहन लाभले. त्यामुळेच कठोर परिश्रमासोबत योग्य दिशेने अभ्यास करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी सांगितले.
अदिती यांचे या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, प्राध्यापक, महाविद्यालयीन मित्रपरिवार तसेच जोगेश्वरी आखाडा येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. गावात सर्वत्र त्यांच्या नावाचा गौरव होत असून पुढील शिक्षणासाठी व करिअरसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत