राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने महावितरण देवळाली प्रवरा उपविभागाच्या वतीने “हसत-खेळत तणावमुक्त जीवन” या विषयावर जाही...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने महावितरण देवळाली प्रवरा उपविभागाच्या वतीने “हसत-खेळत तणावमुक्त जीवन” या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्ट्रेस रिलीफ एक्सपर्ट व विश्व शांती मानवता दूत तथा उप कार्यकारी अभियंता डॉ. चिदानंद आप्पासाहेब फाळके यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात लकी ड्रा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. योगा भवन येथे पार पडलेल्या व्याख्यानानंतर महाप्रसाद देण्यात आला.
कार्यक्रमास श्रीरामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.भंगाळे सहपरिवार उपस्थित होते. तसेच देवळाली प्रवरा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागरे, टाकळीमिया कक्षाचे श्री. विटनोर, कोल्हार कक्षाचे श्री. राजपूत, पाथरे कक्षाचे श्री.फड, देवळाली कक्षाचे श्री.अहिरे , गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधीर पठारे, गोपाल शिंदे, संभाजी निमसे, हरीभाऊ वाकचौरे, श्री. झगडे, श्री सैंदोरे यांच्यासह देवळाली पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश वडते व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष योगदान राहिले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत