राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- पुणे ग्रीन ट्रिब्युनलच्या सन्माननीय न्यायमूर्ती सौ. सी. एम. ढबाले मॅडम यांनी राहुरी फॅक्टरी येथे येऊन श्री साई से...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
पुणे ग्रीन ट्रिब्युनलच्या सन्माननीय न्यायमूर्ती सौ. सी. एम. ढबाले मॅडम यांनी राहुरी फॅक्टरी येथे येऊन श्री साई सेवा नागरी सहकारी पतसंस्था या प्रगतीशील संस्थेला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनाने संस्थेचा परिसर उत्साहाने भरून गेला.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रदीप येवले यांनी सपत्नीक न्यायमूर्तींचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. न्यायमूर्ती ढबाले मॅडम यांचा सन्मान करताना संस्थेच्या वतीने कार्यपद्धती, समाजाभिमुख उपक्रम व पतसंस्थेची आर्थिक प्रगती याची माहिती देण्यात आली.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्तींनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी ग्रामीण भागातील आर्थिक चळवळ मजबूत करण्यासाठी पतसंस्था महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. तसेच समाजाशी नाळ जोडून पारदर्शकतेने सेवा करण्याचा संस्थेचा दृष्टिकोन अनुकरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदिच्छा भेट प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, संचालक मंडळाचे सदस्य मनोहर ढूस, आनंद गुंजाळ, योगेश येवले, विवेक विश्वासराव, विशाल कडू यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी न्यायमूर्तींशी संवाद साधत संस्थेच्या प्रगतीबाबत चर्चा केली.
या भेटीमुळे संस्थेला प्रेरणादायी उर्जा लाभली असून भविष्यात संस्थेच्या कार्याचा व्याप आणखी वाढविण्याचा संकल्प यावेळी चेअरमन प्रदीप येवले व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत