उद्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उद्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण

भाद्रपद शुक्ल १५, रविवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्...

भाद्रपद शुक्ल १५, रविवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे व अंटार्टिका या प्रदेशातून दिसणार असून, भारतात सर्वत्र दृश्यमान होईल.



ग्रहणाची वेळ

स्पर्श : रात्री ०९.५७

संमीलन : रात्री ११.००

मध्य : रात्री ११.४२

उन्मीलन : पहाटे १२.२३

मोक्ष : पहाटे ०१.२७

पर्वकाळ : पहाटे ०३.३०



पुण्यकाल

ग्रहणस्पर्शापासून ते ग्रहणमोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल मानला जाईल.


वेधारंभ

हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने दुपारी १२.३७ पासून ग्रहणमोक्षापर्यंत वेध पाळावेत.या काळात स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप्य, श्राद्ध आदी कर्म करता येतात.


भोजन निषिद्ध आहे.

पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेणे यास परवानगी आहे.

बालक, वृद्ध, आजारी, अशक्त व गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी ५.१५ पासून वेध पाळावेत.



ग्रहणकाळातील आचरण

ग्रहस्पर्श होताच स्नान करावे.

पर्वकाळात देवपूजा, दर्पणदान, श्राद्ध, जप, होम, दान करावे.

ग्रहणमोक्षानंतर स्नान करणे आवश्यक.

अन्नपदार्थ व पाण्यावर तुळशीपत्र ठेवावे.



राशीनुसार फल

शुभफल : मेष, वृषभ, कन्या, धनु

मिश्रफल : मिथुन, सिंह, तुला, मकर

अनिष्टफल : कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन

(अनिष्ट फल असलेल्या राशींनी तसेच गर्भवतींनी ग्रहण पाहणे टाळावे.)


📌 अधिक माहितीसाठी संपर्क :

श्री गुरुकृपा ज्योतिष कार्यालय

श्री. दिनेश विजय जोशी (गुरु)

📞 8055424219 / 9096221631



-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत