राहाता(वेबटीम) बाभळेश्वर येथील श्रीरामपूर रोडवरील टाटा स्टर्लिंग नजीक वाहनधारकांसाठी सोयीची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ओम साई मोटर्...
राहाता(वेबटीम)
बाभळेश्वर येथील श्रीरामपूर रोडवरील टाटा स्टर्लिंग नजीक वाहनधारकांसाठी सोयीची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ओम साई मोटर्स & कार वॉशिंग सेंटरचा भव्य शुभारंभ सोहळा व सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. गुरुवार दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यक्रम संपन्न झाला.
या शुभारंभ प्रसंगी जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री. रावसाहेब नाथाजी म्हसरके, श्री. सुधीर रावसाहेब म्हसरके (चेअरमन, श्रीराम दूध संघ, बाभळेश्वर), तसेच माजी सरपंच राजूभाऊ रामदास म्हसके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते व धार्मिक विधीपूर्वक सत्यनारायण महापूजा करून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या नवीन उपक्रमामध्ये दोन व्हीलर वाहनांची सर्व प्रकारची कामे तसेच चारचाकी व इतर सर्व प्रकारच्या वाहनांची वॉशिंग सेवा उपलब्ध होणार आहे. वाहनधारकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा येथे मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन सुशील देसरडा व परिवार, देवळाली प्रवरा यांनी केले होते. उद्घाटनानंतर उपस्थित पाहुण्यांना व नागरिकांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी गावातील विविध मान्यवर, व्यापारी, युवक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ओम साई मोटर्स & कार वॉशिंग सेंटरमुळे परिसरातील वाहनधारकांना सेवा-सुविधा सहज व दर्जेदार मिळणार असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत