नाथ संप्रदाय जगात सर्वश्रेष्ठ : महंत अरुणनाथगिरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नाथ संप्रदाय जगात सर्वश्रेष्ठ : महंत अरुणनाथगिरी

राहूरी/कनगर:- नाथ संप्रदाय जगात सर्वश्रेष्ठ व आद्य संप्रदाय असून, शैव संप्रदाय आहे. नाथ संप्रदायाची स्थापना मच्छिंद्रनाथांनी केली, तर गोरक्ष...

राहूरी/कनगर:-

नाथ संप्रदाय जगात सर्वश्रेष्ठ व आद्य संप्रदाय असून, शैव संप्रदाय आहे. नाथ संप्रदायाची स्थापना मच्छिंद्रनाथांनी केली, तर गोरक्षनाथांनी या संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. नाथांनी आपल्या भ्रमण फेरीत कणकनगरी तथा कणगर येथे वास्तव्य केले आहे. बुबळेश्वरांची कथा याच भूमीत घडली आहे. त्यामुळे कणगरला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे, असे गौरवोदगार महंत अरुणनाथगिरी महाराजांनी काढले.

कणगर येथे बुबळेश्वरांच्या मंदिरात शिवलिंग, पार्वतीमाता व गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हर्षउल्लाहासात संजय महाराज शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी अरुणनाथगिरी महाराजांनी नवनाथ व नाथ संप्रदायाची कीर्तनातून सविस्तर व विस्तृत माहिती सांगितली. ते म्हणाले, नाथ संप्रदाय प्राचीन भारतीय शैव (शिवभक्त) संप्रदाय असून याचा उदय वारकरी संप्रदायाच्या आधी झाला आहे. हा योगप्रधान संप्रदाय असून आदिनाथ शिव हा सर्वांचा गुरु आहे. या संप्रदायाला नवनाथांची परंपरा जोडली आहे.

यावेळी संजय महाराज शेटे, लखनगिरी महाराज, सोपान महाराज दिवे, गणेश महाराज गीते, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक गोसावी, सरपंच सर्जेराव घाडगे, स्वप्निल महाराज वामन, तात्या महाराज शास्त्री, वेदमूर्ती प्रवीण नवलेगुरु, प्रकाश नवलेगुरु, भास्कर गाढे, वसंतराव घाडगे, गोकुळ मुसमाडे, अण्णासाहेब मुसमाडे, गोरक्षनाथ घाडगे, गहिनीनाथ शेटे, नारायण घाडगे, कणगर ग्रामस्थ व परिसरातील भाविक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत