देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील बाजारतळ परिसरात मातोश्री क्लिनिक या नव्या दवाखान्याचा शुभारंभ शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ व...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येथील बाजारतळ परिसरात मातोश्री क्लिनिक या नव्या दवाखान्याचा शुभारंभ शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांनी या शुभारंभ समारंभाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या नवीन क्लिनिकची स्थापना डॉ. अजय निवृत्ती लोखंडे (BAMS, जनरल फिजिशियन व सर्जन) यांच्या प्रयत्नातून होत असून स्थानिक नागरिकांना यामुळे दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
शुभारंभ कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व रुग्णसेवेसाठी तत्पर नागरिक उपस्थित राहणार असून दवाखान्याच्या माध्यमातून सामान्य रुग्णांना सोयीस्कर, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
📍 स्थळ – बाजारतळ, पोस्ट ऑफिससमोर, देवळाली प्रवरा 📞 संपर्क – 9049498522

कोणत्याही टिप्पण्या नाहीत