राहुरी फॅक्टरी(वेबटीम) श्री गणेशोत्सवानिमित्त राहुरी फॅक्टरी परिसरातील अंबिका नगरात आज शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी सायं ठीक 7.30 वाजता अंबिका ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
श्री गणेशोत्सवानिमित्त राहुरी फॅक्टरी परिसरातील अंबिका नगरात आज शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी सायं ठीक 7.30 वाजता अंबिका मित्र मंडळ आयोजित खेळ पैठणी कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अंबिका मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रसिद्ध निवेदक, पत्रकार गणेशभाऊजी हापसे कार्यक्रमाचे सादरीकरण करणार असून लहान मुले, मुली,तरुण,तरुणी, महिला, वयोवृद्ध व्यक्ती यांचे विविध खेळ घेणार आहेत.दरम्यान उखाणे,कॉमेडी,गप्पा,गोष्टी, प्रश्नमंजुषा याद्वारे सर्वांना खेळात सहभागी होता येणार आहे. खेळात विजयी महिलांना पैठणी व नथ,एक ग्रॅम नेकलेस, मिक्सर,फॅन,कुकर, गॅस शेगडी व लकी ड्रॉ तील
विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. तरी आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हाव असे आवाहन करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक रमेश मोरे, अध्यक्ष ऋषीकेश साळुंके, उपाध्यक्ष योगेश गायकवाड, खजिनदार प्रशांत शेंडे व कार्यकर्त्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत