राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- सालाबाद प्रमाणे यंदाही गुरुकुल वसाहत येथील नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आहे. घटस्थापना व द...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
सालाबाद प्रमाणे यंदाही गुरुकुल वसाहत येथील नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आहे.
घटस्थापना व देवीची प्राणप्रतिष्ठा करत उत्सवात प्रारंभ झालाय.
याप्रसंगी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे यांच्या शुभहस्ते घटस्थापना प्राणप्रतिष्ठा पार पडली. यावेळी पौरोहित्य प्रकाश नवले गुरु यांनी केले.
प्रसंगी पावन गणपती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व गुरुकुल वसाहत येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत