राहुरी फॅक्टरीतील आदर्श पतसंस्थेकडून सभासदांना ११ टक्के लाभांश- चेअरमन प्रा.सुधाकर कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील आदर्श पतसंस्थेकडून सभासदांना ११ टक्के लाभांश- चेअरमन प्रा.सुधाकर कदम

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात आर्थिक दृष्ट्या अग्रगण्य असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेने दिवाळीनिमित्त सर्व सभा...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यात आर्थिक दृष्ट्या अग्रगण्य असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेने दिवाळीनिमित्त सर्व सभासदांना ११ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्रा.सुधाकर कदम यांनी दिली आहे.



राहुरी फॅक्टरी येथील आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी संस्थेचे मार्गदर्शक व विद्यमान संचालक अण्णासाहेब चोथे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रसंगी चेअरमन कदम बोलत होते.

     याबाबत माहिती देताना प्रा.कदम यांनी सांगितले की संस्थेने ८० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केलेला आहे त्याचबरोबर संस्थेचे एकूण कर्ज वाटप सुमारे ५० कोटी पर्यंत आहे व गुंतवणूक ३१ कोटीं तर वार्षिक उलाढाल जवळपास ६०० कोटी रुपयांची आहे. हे संचालक मंडळावर विश्वास असल्याने या संस्थेकडे ठेवींचा ओघ वाढत आहे त्याचबरोबर सर्वच स्तरावर काम करत असताना सामाजिक भूमिका ही संस्था आपल्या परीने योग्य रीतीने निभावत आहे. सभासदांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने वर्षी सर्व सभासदांना  ११ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.


अण्णासाहेब चोथे म्हणाले की, आदर्श नागरी पतसंसंस्थेने  सभासदांचे हित जोपासण्याचे  काम केले आहे. पारदर्शी व विश्वासू कारभारामुळे आदर्श नागरिक पतसंस्थेवर सभासदांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे हाच विश्वास कायम ठेवून सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेऊ असे ते म्हणाले.


 प्रारंभी अहवाल वाचन मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. यावेळी व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज, ज्येष्ठ सभासद विठ्ठल शेटे, रामचंद्र काळे, संचालक कमल काळे, मारुती खरात, दत्तात्रय रोडे, अविनाश साबरे, भारत चोथे, प्रकाश सोनी, दत्तात्रय मोरे, संभाजी सौदागर, किशोर पवार, संभाजी हारगुडे, किरण सोनवणे  आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत