देवळाली प्रवरा येथे पद्मावती माता मंदिरात नवरात्र उत्सवाची सुरुवात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथे पद्मावती माता मंदिरात नवरात्र उत्सवाची सुरुवात

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ऐतिहासिक पद्मावती माता मंदिरात मोठ्या भक्तिभावाने नवरात्र उत्सवास प्रारंभ झ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ऐतिहासिक पद्मावती माता मंदिरात मोठ्या भक्तिभावाने नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. सकाळी मंत्रोच्चार व धार्मिक विधीमध्ये विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली.



 करजगाव येथून आणलेल्या पवित्र ज्योतीचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. शहरात सनई चौघडा गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि देवीच्या जयघोषात ज्योत पद्मावती मंदिरात आणली गेली. या वेळी मंदिर परिसरात भक्ति व उत्साह यांचे अनोखे वातावरण पाहायला मिळाले.


उत्सवाच्या प्रारंभीच्या विधींना उपस्थित राहून भक्तांनी देवी चरणी नतमस्तक होत आपल्या कुटुंबासाठी व गावाच्या प्रगतीसाठी मंगलकामना व्यक्त केल्या.


या प्रसंगी बापूसाहेब पठारे, मंजाबापू पठारे, वसंत पठारे, अशोक पठारे, सुधीर पठारे, सुभाष पठारे, अनिल पठारे, बाबासाहेब पठारे, अरुण पठारे, राहुल पठारे, आर्यन पठारे, विजय संसारे, शुभम पठारे, भूषण पठारे, मारुती पठारे, सोहम नवथर, नीलेश पठारे, शरद पठारे, दीपक पठारे, रावसाहेब पठारे, सचिन साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक भक्तगण उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत