राहुरी तालुक्यातील मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या टाकळीमियात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या टाकळीमियात

(राहुरी श्रेयस लोळगे) राहुरी तालुक्यातील अग्रगण्य असणारी मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, टाकळीमिया या संस्थेची वार्षिक...

(राहुरी श्रेयस लोळगे)

राहुरी तालुक्यातील अग्रगण्य असणारी मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, टाकळीमिया या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, महादेव मंदिर, टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे आदरणीय अध्यक्ष मा.श्री. शामराव शंकरराव निमसे हे भूषविणार आहेत.

या सभेमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असून, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.अशोक रामदास शिंदे व जनरल मॅनेजर मा.श्री. अनिरुद्ध रामकृष्ण लोखंडे यांनी सर्व सभासदांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सभेमध्ये पुढील विषयांवर चर्चा व निर्णय अपेक्षित आहेत:माननीय अध्यक्षांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती,देशासाठी बलिदान देणाऱ्या दिवंगत सैनिक, थोर नेते व साहित्यिकांना श्रद्धांजली,सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील वार्षिक पत्रके वाचून मंजुरी,शासकीय ऑडिट मेमोचे वाचन व मंजुरी, सन २०२५-२०२६ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर करून मंजुरी,संस्थेची थकबाकी स्थिती व उपाययोजना, ३१ मार्च २०२५ अखेर झालेल्या नफ्याचे वाटप,सहकारी संस्था अधिनियमांतर्गत आदर्श उपविधींची अंमलबजावणी,नव्या वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची निवड,संचालक व त्यांच्या नातेवाईकांकडील कर्जाचा तपशील,अध्यक्षांच्या पुनरपरवानगीने ऐनवेळी उद्भवलेल्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, संस्थेच्या पारदर्शक व सामाजिक दृष्टिकोनातून चालवलेल्या कामकाजामुळे तिचा लौकिक वाढत आहे. ही सभा संस्था व सभासद यांच्यातील विश्वासाची मजबूत पायाभरणी करणारी ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत