राहुरीतल आई तुळजाभवानी माता नवरात्र उत्सव मंडळ २०२५ ची कार्यकारिणी जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतल आई तुळजाभवानी माता नवरात्र उत्सव मंडळ २०२५ ची कार्यकारिणी जाहीर

(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी शहरातील श्री तुळजाभवानी मंदिर तसेच तेली समाज मंदिरात येणाऱ्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, आई तुळज...

(राहुरी : श्रेयस लोळगे)

राहुरी शहरातील श्री तुळजाभवानी मंदिर तसेच तेली समाज मंदिरात येणाऱ्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, आई तुळजाभवानी माता नवरात्र उत्सव मंडळ २०२५ या मंडळाच्या वतीने काल दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी उत्सव नियोजनासाठी एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी श्री. विशाल शेजुळ यांची एकमुखाने निवड झाली असून, उपाध्यक्षपदी श्री. योगेश लोखंडे, खजिनदारपदी श्री. सचिन ढवळे आणि सचिवपदी श्री. कृष्णा(सोनु)इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या माध्यमातून यंदाच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन अधिक भव्य, भक्तिमय आणि पारंपरिक पद्धतीने करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस समस्त तेली समाजातील युवक वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, देवीच्या आरत्या, सजावट व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

राहुरी शहरात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदाही आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी भाविकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत