देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युनिटी ऑफ ह्युमिनिटी सोशल...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युनिटी ऑफ ह्युमिनिटी सोशल अँड एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटी, देवळाली प्रवरा यांच्या वतीने व रोटरी ब्लड सेंटर, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ईदगाह मैदान, देवळाली प्रवरा येथे होणार आहे.
या उपक्रमाचे उद्दिष्ट मानवतेची एकता आणि रक्तदानातून जीवदान या संकल्पनेला अधोरेखित करणे आहे. रक्तदान हीच खरी समाजसेवा असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
आयोजक मंडळाने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत