राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीत उद्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरीत उद्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.बा.बा तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सह प्रादेशिक अधिकारी संदीप निमसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून उद्या सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विवेकानंद नर्सिंग होम या ठिकाणी सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत