राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगावला राष्ट्रीय पंचायत राज अभियानचा स्वच्छ व हरित गावासाठीचा सन 2022-23 चा जिल्हास्तरीय...
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगावला राष्ट्रीय पंचायत राज अभियानचा स्वच्छ व हरित गावासाठीचा सन 2022-23 चा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे यांच्या हस्ते दि.5 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर येथे वितरीत करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमामध्ये पंचायत राज मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने शाश्वत विकास यांचे स्थानिकीकरण कार्यक्रमांतर्गत पंचायत विकास निर्देशांक व राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सन 2022-23 वर आधारित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छ व हरित गाव या संकल्पनेत राहुरी तालुक्यातील गणेगाव या गावाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदर्श गाव गणेगाव ला सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गणेगावच्या सरपंच सौ. शोभाताई अमोल भनगडे व सर्व सदस्य व ग्रामस्थांचे तसेच मार्गदर्शक भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे यांचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, आ.शिवाजीराव कर्डिले, माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत