पानेगांव (वार्ताहर):- नेवासा तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परीसरातील खुपटी, गोणेगांव,निंभारी, अंमळनेर ,करजगांव, वाटापूर, तामसवाडी ,पान...
पानेगांव (वार्ताहर):-
नेवासा तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परीसरातील खुपटी, गोणेगांव,निंभारी, अंमळनेर ,करजगांव, वाटापूर, तामसवाडी ,पानेगांव, शिरेगांव ,खेडलेपरमानंद, लांडेवाडी, गणेशवाडी, उंबरे, ब्राह्मणी, वळण मानोरी, मांजरी सह सोनई परीसरात शनिवारी रात्रीपासून विजेचा कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस प्रचंड पाऊसाने झोडपले. पाच दिवसांचा विश्रांतीनंतर शनिवारी रात्रीच्या पाऊसाने सर्वच रेकॉर्ड मोडत काढीत चौफेर झोडपल्याने नदी ओढे नाले क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ओसंडून वाहत होते. त्यामुळे मुळाधरणातुन मुळानदी पात्रात सुरुवातीला पाच हजार क्युसचने नंतर मुळाधरणात वरुन येणारी आवक पाहून पाटबंधारे विभागाने विसर्ग पंचवीस हजार क्युसचने मुळानदी पात्रात सोडण्यात आला त्याच बरोबर देवनदी आलेला पुर त्यामुळे नदी पात्र धोक्याचा बाहेर वाहत आहे. खेडलेपरमानंद - वळण पुलावरून पाणी असल्याने संपर्क तुटला त्याच बरोबर. वाटापूर -तामसवाडी पुलावरुन पाणी असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. सोनई कडे करजगांव,शिरेगांव खेडलेपरमानंद जाणारे रस्ते बंद झाले पुन्हा शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं.
शेतामध्ये असणारे बाजरी, ऊस, कपाशी, ऊस, मका,घास मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथे असणाऱ्या ओढा कडेचा जमिनी हि वाहून गेल्या असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे.
- महायुती सरकार वाट कुणाची पाहता शासन दरबारी पाऊसाची नोंद झाली असून प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. लोकप्रतीनिधी,प्रशासनाने यांनी फोटोसेशन न करता पंजाब सरकार ज्या पद्धतीने मदत केली त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना मदत देवून तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी - चंद्रकांत जगताप -सरपंच तामसवाडी
- मुळाथडी परीसरात झालेला प्रचंड पाऊसाने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने एकरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी-संजय जंगले मा. सरपंच पानेगांव


कोणत्याही टिप्पण्या नाहीत