दुर्गामाता दौडीला राहुरीत उत्स्फूर्त प्रतिसाद : राष्ट्रप्रेम आणि परंपरेचा अनोखा संगम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दुर्गामाता दौडीला राहुरीत उत्स्फूर्त प्रतिसाद : राष्ट्रप्रेम आणि परंपरेचा अनोखा संगम

(राहुरी वेब : प्रतिनिधी) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राहुरी शहरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दुर्गामाता द...

(राहुरी वेब : प्रतिनिधी)

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राहुरी शहरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहाटेच्या शीतल वातावरणात, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकारांनी शहराचे आकाश दुमदुमत असून, ही दौड परंपरेचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश घेऊन मार्गक्रमण करत आहे.

दररोज पहाटे सात वाजता ही दौड भगव्या झेंड्यांनी सजलेल्या रस्त्यांवरून शहरातुन उत्साहात निघते. लहानग्यांपासून युवावर्गापर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांचा या दौडीत उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो. महिलावर्ग भगव्या ध्वजाचे औक्षण करून ओवाळणी करीत परंपरेला साजेसे श्रद्धापूर्वक स्वागत करतात.

दुर्गामाता दौडीदरम्यान ‘श्री शिवाजी, श्री संभाजी रक्तगटाची पिढी निर्माण व्हावी’, ‘देश-धर्म रक्षणासाठी सदैव सज्ज राहा’, 'जय भवानी जय शिवाजी',' 'छत्रपती संभाजी महाराज की जय',अशा घोषणांनी व राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या गीतांनी शहरात नवा उत्साह संचारतो. ही दौड केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती सामाजिक एकोपा, हिंदू सांस्कृतिक अभिमान आणि तरुणाईत राष्ट्रनिष्ठा जागवणारा एक प्रभावी उपक्रम ठरत आहे.

राहुरी शहरातील विविध भागांतून दौडीचे जल्लोषात स्वागत करण्यात येते. टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात सहभागी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले जाते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्य संपूर्ण देशभर सक्रिय असून, नवरात्रीच्या निमित्ताने देशातील विविध शहरांमध्ये अशा स्वरूपाच्या दुर्गामाता दौडींचे आयोजन केले जाते.

राहुरीतील ही दौड सामाजिक सलोखा, उत्सवप्रियता आणि देशभक्तीचे प्रतीक ठरत असून, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ती शहरवासीयांच्या अभिमानाचा भाग बनली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत