राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळाने साकारलेल्या गोरक्षनाथ जन्म सोहळा या हलत्या देखाव्याचे काल मंग...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळाने साकारलेल्या गोरक्षनाथ जन्म सोहळा या हलत्या देखाव्याचे काल मंगळवारी श्री क्षेत्र ताहाराबाद देवस्थानचा मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
प्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे , तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवरात्र काळात ९ दिवस गोरक्षनाथ जन्म देखावा हा भाविकांना बघावयास मिळणार आहे.
यावेळी शुभम जाधव,कृष्णा खर्डे,बाबा आढाव, अनुप राऊत, देवीदास कोठुळे, अनुप राऊत, प्रसाद जाधव, योगेश राऊत, राजेंद्र साळुंके, दादा दुधाडे, अनिकेत वाळके, साई मुसमाडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत