राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- देवळाली प्रवरा नगपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुखदेवराव माधवराव मुसमाडे यांचा एकात्तरी सोहळा व त्यांच्या जीवन कार्या...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
देवळाली प्रवरा नगपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुखदेवराव माधवराव मुसमाडे यांचा एकात्तरी सोहळा व त्यांच्या जीवन कार्यावर आधारित बिकट वाट. सुखाची पहाट एका कृषी पुत्राची जीवन वाटचाल पुस्तक वितरण सोहळा उद्या रविवार ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे.
ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) संत तुकाराम महाराज संस्थान, नेवासा यांच्या शुभहस्ते माजी खा. प्रसाद उर्फ बापूसाहेब अध्यतेखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, माजी चेअरमन नानासाहेब पा. पठारे, माजी संचालक संभाजीराजे कदम,ह.भ.प श्री. गोरखकाका चव्हाण व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन लक्ष्मणराव मुसमाडे, भाऊसाहेब मुसमाडे, जयेश मुसमाडे, प्रशांत मुसमाडे, जयश्री मुसळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत