श्रीगोंदा(गणेश कांबळे) अग्नीपंख फौंडेशनने लोणीव्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात अग्नीपंख फौंडेशनने आयोजीत केलेल्या सन्मान सोहळ्यात एमप...
श्रीगोंदा(गणेश कांबळे)
अग्नीपंख फौंडेशनने लोणीव्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात अग्नीपंख फौंडेशनने आयोजीत केलेल्या सन्मान सोहळ्यात एमपीएससी परिक्षा पास विद्यार्थ्यांचा गौरव दोन महिला खेळाडूंना मदतीचा हात दिला.
हा गौरव उद्योजक प्रकाश कुतवळ व राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांचे हस्ते केला अध्यक्षस्थानी नागवडे साखर कारखान्याचे संचालक डी आर काकडे होते. एम पी एस सी परिक्षेत यशाचे शिखर सर करणारे सोहेल शेख किरण मखरे व किरण पवार (मुंबई पोलीस) यांना सन्मानीत केले तसेच धावपटू सुरेखा मातणे व विवाहानंतर पोलिस काॅस्टेबल होण्यासाठी मैदानात उतरलेली आदिवासी समाजातील रागिनी चव्हाण यांना मदत करण्यात आली यावेळी प्रकाश कुतवळ म्हणाले कि भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणेने प्रेरीत होऊन अग्नीपंख फौंडेशनने शाळा विद्यार्थी व खेळाडूंसाठी चांगले काम करीत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. बाळासाहेब नाहाटा म्हणाले कि अग्नीपंख फौंडेशन निस्वार्थ भावनेने काम करुन प्रेरणा विश्वासाची बीज पेरीत आहेत. यावेळी डी आर काकडे प्राचार्य बाळासाहेब जठार यांची भाषणे झाली यावेळी मनोज जगताप बंडू खंडागळे शिवदास शिंदे भाऊसाहेब वाघ उपस्थित होते प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी तर सुत्रसंचलन कार्तिक काकडे व ऋतुजा काकडे यांनी केले आभार किसन वऱ्हाडे यांनी मानले.
पुरग्रस्तांना मदत
अग्नीपंख फौंडेशनच्या माध्यमातून सीना नदी काठावरील बाळेवाडी ( करमाळा) पुरग्रस्तांना किराणा किट व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप अग्नीपंख फौंडेशनच्या माजी उपाध्यक्ष सुरेखा नानासाहेब शेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळेवाडीतील पुरग्रस्त नागरिकांनी अग्नीपंख फौंडेशनला धन्यवाद दिले. या उपक्रमासाठी हडपसर येथील मगरपट्टा सिटीतील दानशुर व्यक्तींनी सहकार्य केले. फोटो मेलवर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत