(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरीचे आमदार आणि महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक, शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकाची लाट...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
राहुरीचे आमदार आणि महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक, शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकाची लाट पसरली आहे. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी त्यांच्या बुऱ्हानगर निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली तसेच त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती ना. राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, मंत्री जयकुमार रावल, अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार सुजय विखे,खा. राजाभाऊ वाजे,माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते आणि आमदार राहुल कुल यांनी राहुरी येथे येऊन आमदार कर्डिले यांच्या पत्नी अलकाताई कर्डिले व मुलगा अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन सांत्वन केले.या सर्व मान्यवरांनी शिवाजीराव कर्डिले यांचे सार्वजनिक जीवन, त्यांची जनसंपर्काची हातोटी, आणि कार्यकर्त्यांशी असलेले नाते याचा विशेष उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याने केवळ राहुरी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे एक जनतेशी जोडलेले नेते हरपले असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांची कार्यपद्धती, नेतृत्वशैली आणि ठाम भूमिका यामुळे ते नेहमीच राज्याच्या राजकारणात लक्षवेधी ठरले.
या शोकाकुल प्रसंगी राज्यातील राजकारणातील एकता आणि सहवेदना याचे दर्शन घडले. पुढील काळात कर्डिले कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर या रिक्ततेची जबाबदारी मोठ्या ताकदीने पेलावी लागणार आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत