राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील सगळ्यांच गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीकांचे आतोनात नुकसान झालेले ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील सगळ्यांच गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीकांचे आतोनात नुकसान झालेले आहे. सध्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असून राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सचिन म्हसे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
राहुरी तालुक्यात अतिवृष्टी मुळं झालेल्या अनेक गावांत जाऊन त्यांनी परिस्थीची पहाणी केली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतमळे पाण्यासाली गेले आहेत मका घास, कपाशी, सोयाबीन या सारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकर्यांचे परिश्रम वाया गेले असून शेतकर्याची अवस्था बिकट झाली आह शेतकरी बांधव हातबल झाले आहेत जर शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे केला नाही तर शेतकरी निराशेच्या गर्तेत ढकलले जातील शेतकरी जगलाच नाही तर देशाचे अर्थकारण कोलमडेल यांचा विचार शासनाने गांभीर्याने केला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत