देवळाली प्रवरा(वेबटीम ) स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आमदार हेमंत ओगले...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आमदार हेमंत ओगले उद्या शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जनसंपर्क कार्यालय, देवळाली प्रवरा येथे उपस्थित राहणार आहेत.
या जनसंपर्क भेटीद्वारे आमदार ओगले नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्यांची माहिती घेणार असून त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाशी समन्वय साधणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत