पेडगाव–श्रीगोंदा रस्त्याची रुंदी सात मीटरच हवी; ग्रामस्थांचा आवाज मंत्र्यांपर्यंत पोहोचला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पेडगाव–श्रीगोंदा रस्त्याची रुंदी सात मीटरच हवी; ग्रामस्थांचा आवाज मंत्र्यांपर्यंत पोहोचला

मुंबई(वेबटीम)  पेडगाव–श्रीगोंदा हा रस्ता केवळ प्रवासाचा मार्ग नसून, हजारो शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जी...

मुंबई(वेबटीम)



 पेडगाव–श्रीगोंदा हा रस्ता केवळ प्रवासाचा मार्ग नसून, हजारो शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला जीवनदायी मार्ग आहे. परंतु अनेक वर्षांपासून या रस्त्याची अपुरी रुंदी, दुरवस्था आणि दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अखेर पेडगाव ग्रामस्थांनी एकजूट दाखवत या अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे.

            या मागणीसाठी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन पेडगाव–श्रीगोंदा रस्ता (MDR-62) सात मीटर रुंदीचा करण्याचे निवेदन सादर करण्यात आले. तसेच श्रीगोंदा तालुक्याचे आमदार मा. विक्रम पाचपूते यांना ही निवेदन देऊन हीच मागणी करण्यात आली. 

               या निवेदनात पेडगाव ग्रामस्थांनी आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत दत्तात्रय ओगले यांनी नमूद केले आहे की, श्रीगोंदा–पेडगाव हा MDR-62 क्रमांकाचा प्रमुख मार्ग असून या मार्गाचे विकासकाम सध्या सुरू आहे. मात्र, या कामातून ऐतिहासिक पेडगाव गावाला सात मीटर मधून वगळण्यात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

               पेडगाव हे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव आहे. या गावात श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला पवित्र भूमीभाग आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या लढ्याच्या काळातील या ठिकाणाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे.

               श्री. ओगले यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “पेडगाव ते श्रीगोंदा या मार्गावर सुमारे ७ किमी अंतर आहे. हा भाग सध्या अपुरा असून, रस्त्याची रुंदी कमी असल्याने वाहतूक सुरळीत होत नाही. ग्रामस्थांच्या हितासाठी आणि ऐतिहासिक पेडगाव गावाशी न्याय करण्यासाठी या मार्गाचे सात मीटर रुंदीकरण करणे अत्यावश्यक आहे.”

           भविष्यात ही मागणी मंजूर झाली नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत दत्तात्रय ओगले यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत