राहुरी (वेबटीम) अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता माजीमंत्री ...
राहुरी (वेबटीम)
अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालयावर शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
“देवाभाऊ भाऊबीजेला कर्जमाफीची ओवाळणी द्या” या घोषवाक्याखाली आयोजित या मोर्चाचे आयोजन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा आक्रोश मोर्चा सरकारपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करत हे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
“ना आमचा दसरा... ना आमची दिवाळी” असे सांगत शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी या मोर्चातून होणार आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत