देवळाली प्रवरा(वेबटीम) अस्तगाव येथे शिवमहापुराण कथेसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चव्हाण वस्तीवरील महिलांचे सोन्याचे गंठण, म...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
अस्तगाव येथे शिवमहापुराण कथेसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चव्हाण वस्तीवरील महिलांचे सोन्याचे गंठण, मोबाईल आणि पर्स असा ऐवज लंपास केला आहे.
सौ. मीनाताई अशोक चव्हाण आणि सौ. प्राचीताई गणेश चव्हाण यांचे दोन मोबाईल व पर्स चोरीस गेल्या असून, सौ. वैशाली राम चव्हाण यांचे गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी पळवले.
या महिलांनी पाचही दिवसांसाठी शिवकथेला जाण्यासाठी गाडी भाड्याने केली होती. मात्र, काल पहिल्याच दिवशी गर्दीच्या गोंधळात चोरट्यांनी लोटालोटीचा फायदा घेत चोरीचा प्रकार केला.
यानिमित्ताने पोलिसांनी आवाहन केले आहे की, शिवमहापुराण गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी किंमती वस्तू जसे की सोन्याचे दागिने, मोठ्या रकमेची रोकड किंवा महागडे मोबाईल घेऊन जाऊ नयेत, तसेच आपली पर्स आणि वस्तू सुरक्षित ठेवल्या जाव्यात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत