(राहुरी : श्रेयस लोळगे) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ गटांचे आरक्षण आज...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ गटांचे आरक्षण आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. राहुरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व दहा गणांकरिता आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली असून, त्याचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
जिल्हा परिषद गटांसाठी आरक्षण:
टाकळीमिया गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC महिला)
ब्राह्मणी गट – सर्वसाधारण (Open)
गुहा गट – सर्वसाधारण पुरुष (Open पुरुष)
बारागाव नांदूर गट – अनुसूचित जमाती महिला (ST महिला)
वांबोरी गट – सर्वसाधारण महिला (Open महिला)
पंचायत समिती गणांसाठी आरक्षण:
१०३ कोल्हार खुर्द – सर्वसाधारण महिला (Open महिला)
१०४ टाकळीमिया – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC महिला)
१०५ मानोरी – सर्वसाधारण पुरुष (Open पुरुष)
१०६ ब्राह्मणी – सर्वसाधारण महिला (Open महिला)
१०७ गुहा – सर्वसाधारण महिला (Open महिला)
१०८ सात्रळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष (OBC पुरुष)
१०९ बारागाव नांदूर – अनुसूचित जमाती महिला (ST महिला)
११० डिग्रस – अनुसूचित जाती पुरुष (SC पुरुष)
१११ उंबरे – सर्वसाधारण पुरुष (Open पुरुष)
११२ वांबोरी – सर्वसाधारण पुरुष (Open पुरुष)
या आरक्षणानुसार तालुक्याच्या राजकीय गणितात बदल होण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरूवात केली आहे. महिलांसाठी विविध गट व गण आरक्षित झाल्यामुळे महिला प्रतिनिधीत्वात वाढ होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत