(राहुरी : श्रेयस लोळगे) शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने आधार कार्डाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. मात्र राहुरी ...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने आधार कार्डाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. मात्र राहुरी तालुक्यातील आधार नोंदणी केंद्रच बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राहुरी शहरात एकमेव आधार नोंदणी केंद्र कार्यरत होते, तर तालुक्यात एकूण आठ केंद्रे सुरू करण्यात आली होती. यापैकी मोठ्या गावांतील दोन केंद्रे आधीच बंद झाली आहेत. उर्वरित सहा केंद्रांपैकी राहुरीतील 3व इतर क्षेत्रातील 3केंद्रे मागील 4-10 महिन्याभरापासून बंद आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना आधार नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावत करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्र, तसेच अंध, अपंग व वृद्ध नागरिकांचे ई-केवायसी या सर्व प्रक्रियांना आधार आवश्यक असल्याने सामान्य नागरिकांचे काम ठप्प झाले आहे.
शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार,
ताहाराबाद, बारागाव नांदूर(नवीन),देवळालीप्रवरा,राहुरी
टाकळीमिया,ब्राह्मणी,वांबोरी, सोनगाव सात्रळ यापैकी टाकळीमिया,वांबोरी,देवळालीप्रवरा,सोनगाव सात्रळ ही महसूल मंडळाला अंतर्गत असणारी आधार केंद्र सुरू आहे.
नवीन मशीनं आधार संच उपलब्ध असून अजून पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय तुन वाटप केलेली नाही.
या गंभीर परिस्थितीमुळे राहुरीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सादर करत तातडीने सर्व बंद पडलेली आधार केंद्रे पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “सरकारने आधार अनिवार्य केले आहे, पण सुविधा मात्र बंद आहेत. अशा दुहेरी धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.”
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत राहुरी तालुक्यातील सर्व आधार केंद्रे पुन्हा सुरू करावीत, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत