देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक दृष्टीने शिवसेना शिंदे गटाच्या बैठकांचे सूत्र सुरू असून आज राहुरी फॅक्टरी येथील श्री...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक दृष्टीने शिवसेना शिंदे गटाच्या बैठकांचे सूत्र सुरू असून आज राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर लॉन्स येथे शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली.
सायंकाळी पक्ष निरीक्षक श्री.गालपगारे यांनी इच्छुक उमेदवार व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील कराळे, शिवसेना ३२ गाव तालुकाप्रमुख वसंत कदम, शहरप्रमुख विक्रम फाटे, संगम रसाळ, महिला आघाडी प्रमुख गोपाळे, आरोग्य विभाग तालुका प्रमुख श्री.साळुंके आदी उपस्थित होते.
यावेळी सुनील कराळे यांनी देवळाली प्रवरा नगरपालिका संदर्भात माहिती दिली. पक्ष निरीक्षक यांना माहिती दिली.पक्ष निरीक्षक गालपगारे यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले.
याच ठिकाणी सायंकाळी हिंदुधर्मरक्षक सागर बेग यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी माजी नगरसेवक सचिन ढुस, सुनील कराळे, किशोर गडाख, सचिन घोरपडे, विक्रम फाटे, संगम रसाळ, कार्तिक गीते, प्रेम गायकवाड उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत